esakal | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव; CBI नं दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव; CBI नं दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी याचिका

Breaking: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव; CBI नं दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी याचिका

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणआणि एका घटनेमुळे ढवळून निघालं आहे. ती घटना म्हणजे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग (Param bir Singh) यांनी त्यांच्या लेटरबॉम्बमधून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप. १०० कोटींच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं (Bombay Highcourt) या घटनेची चौकशी CBI कडे देण्यात यावी असे आदेश दिले होते. याप्रकरणी सीबीआयनं देशमुखांविरोधात FIR दाखल केली होती. आता हीच FIR मागे घेण्यात यावी यासाठी अनिल देशमुखांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे अशी माहिती समोर येतेय. (Anil Deshmukh filed petition in high court against CBI FIR)

हेही वाचा: महाराष्ट्र अँटीबायोटीक कंपनीचा तब्बल १०० कोटीचा निधी गहाळ; सहा वर्षानंतरही कंपनीला कुलूपच

गेल्या काही दिवसांपूर्वीच CBI नं १०० कोटींच्या खंडणीप्रकरणी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर CBI नं छापा टाकत अनेक कागदपत्र आणि पुरावे जप्त केले होते. याच आधारावर CBI कडून अनिल देशमुखांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली होती. यामुळे CBI ला त्यांची चौकशी सुलभतेने करता येणार होती.

मात्र आता अनिल देशमुख यांनी याच फार विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. CBI नं दाखल केलेल्या FIR मधील सर्व आरोप चुकीचे आहेत आणि आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही त्यामुळे ही FIR लवकरात लवकर मागे घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका देशमुखांनी हायकोर्टात दाखल केली आहे.

हेही वाचा: नागपूरकरांनो, बाधितांची संख्या घटतेय; ७२ तासांत तब्बल २१ हजार २४५ रुग्णांची कोरोनावर मात

अनिल देशमुखांची याचिका दाखल करण्याची सध्या प्रोसेस सुरु आहे अशी माहिती मिळतेय. आता त्यांच्या या याचिकेवर मुंबई हायकोर्टाची काय भुमिका असणार आणि सुनावणी कधी होणार हे बघणं आता महत्वाचं असणार आहे.

loading image