'अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी', नितेश राणेंचं सूचक टि्वट

'नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे विशेष आभार'
'अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी', नितेश राणेंचं सूचक टि्वट

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांना सोमवारी रात्री उशिरा सक्त वसुली संचालनालयाने (ED) (ईडी) अटक केली. सुमारे १२ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. अनिल देशमुखांच्या अटकेनंतर कणकवलीचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांचे सुपूत्र नितेश राणे (Nitesh rane) यांनी अत्यंत सूचक टि्वट केलं आहे.

"अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी, अनिल परब मेरी ख्रिसमस, नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे विशेष आभार" असं टि्वटमध्ये म्हटलं आहे.

'अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी', नितेश राणेंचं सूचक टि्वट
‘जीएसटी’ची आतषबाजी; संकलन १.३० लाख कोटींवर

अनिल देशमुखांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाऊ शकते. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची सुद्धा ईडीने चौकशी केली आहे. त्यांच्यावर सुद्धा लवकरच कारवाई होईल, असे नितेश राणे यांना सूचित करायचे आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू आहे.

'अनिल देशमुख हॅप्पी दिवाळी', नितेश राणेंचं सूचक टि्वट
Bypolls Election Result: तीन लोकसभा तर 29 विधानसभा जागांचा आज निकाल

अनिल देशमुख यांच्या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकारच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. आजपर्यंत ‘ईडी’ने चार वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलांच्या मार्फत उत्तर देत कारवाईचा तपशिल मागितला होता. अखेर काल सकाळी ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. ‘ईडी’च्या संभाव्य कारवाईच्या विरोधात न्यायालयीन लढाईत अपयश आल्यानंतर देशमुख सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com