अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; कोर्टानं जामिनावरील निर्णय ठेवला राखून

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.
home minister anil deshmukh reaction on sachin waze
home minister anil deshmukh reaction on sachin waze esakal

मुंबई : कथीत वसुली प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना दिला कोर्टाकडून दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून मुंबईच्या विशेष कोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे. (Anil Deshmukh is not relieved the court upheld the decision)

home minister anil deshmukh reaction on sachin waze
125 तास रेकॉर्डिंग करु शकणाऱ्या फडणवीसांचं कौतुक करायला पाहिजे: शरद पवार

अनिल देशमुख सध्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी सध्या मुंबई मध्यवर्ती कारागृहात (आर्थर रोड) आहेत. आज मुंबईतील विशेष न्यायालय अनिल देशमुख यांच्या जामिनावर निर्णय देणार होतं. पण निर्णय लिहून पूर्ण न झाल्यानं आज निर्णय देता येतं नाही, असं न्यायाधीश रोकडे यांनी सांगितलं. म्हणजेच अनिल देशमुख यांना तुर्तास कारागृहात रहावं लागणार आहे.

home minister anil deshmukh reaction on sachin waze
निकालापूर्वीच मायावतींनी भाऊ-पुतण्याला दिली मोठी जबाबदारी

गेल्यावर्षी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर अडचणीत आल्यानं देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

home minister anil deshmukh reaction on sachin waze
पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींचं राऊतांना पत्र, म्हणाले...

दरम्यान, ईडीला दिलेल्या जबाबाबात देशमुख यांनी सांगितलं होतं की, परमबीर सिंग यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. पण सिंग यांना पोलीस आयुक्तपदावरुन यासाठी हटवण्यात आलं होतं की, त्यांचे निकटवर्तीय एपीआय सचिन वाझे आणि इतर चार लोकांचं नाव अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात पुढे आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com