निकालापूर्वीच मायावतींनी भाऊ-पुतण्याला दिली मोठी जबाबदारी; जाणून घ्या BSP चा मास्टर प्लान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mayawati

रामजी गौतम यांना 'या' पदावरून हटवण्यात आलंय.

निकालापूर्वीच मायावतींनी भाऊ-पुतण्याला दिली मोठी जबाबदारी

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (Bahujan Samaj Party) अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh Assembly Election) निकाल लागण्यापूर्वीच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी सुरू केलीय. त्यासाठी मायावतींनी बसपामध्ये राष्ट्रीय स्तरावर नव्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. बसपा सुप्रिमोनं या अंतर्गत त्यांचा भाऊ आनंद कुमार (Anand Kumar) आणि पुतण्या आकाश आनंद यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. बसपामध्ये (BSP) राष्ट्रीय स्तरावर आता एकच समन्वयक असणार असल्याचं मायावतींनी जाहीर केलंय. दरम्यान, रामजी गौतम (Ramji Gautam) यांना या पदावरून हटवण्यात आलंय. तसेच राष्ट्रीय सरचिटणीसांची संख्या 5 वरून 6 करण्यात आलीय.

लखनऊमध्ये (Lucknow) झालेल्या राष्ट्रीय कोअर कमिटीच्या (National Core Committee) दोन दिवसीय बैठकीत बसपा सुप्रिमो मायावतींनी हा निर्णय घेतलाय. पक्षाच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशातील सर्व राज्यांची 7 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आलीय. यासाठी प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत, जे थेट मायावतींना अहवाल देतील.

हेही वाचा: 'राष्ट्रवादीच्या दीपक पवारांना राजकारणातून कायमचं हद्दपार करा'

बसपानं रामजी गौतम, खासदार अशोक सिद्धार्थ, धरमवीर अशोक, रणधीर सिंह बेनिवाल, दिनेश चंद्रा, सुबोध कुमार आणि लालजी मेधनकर यांना वेगवेगळ्या राज्यांचे प्रभारी बनवले आहे. राष्ट्रीय स्तरावर समन्वयासाठी पुतण्या आकाश आनंद काम करणार असून आकाश हे राष्ट्रीय स्तरावरील समस्यांवर लक्ष ठेवतील आणि मायावतींच्या सूचनेनुसार काम करतील, असं पक्षाकडून सांगण्यात आलंय.

Web Title: Mayawati Gives Big Duty To Brother And Nephew In Bsp Up Election Result 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top