सर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार - अनिल देशमुख

सर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार - अनिल देशमुख

मुंबई  : महाराष्ट्र पोलिस दलात मेगाभरती होणार यावर आज शिक्कामोर्तब झालाय. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालाय. महाराष्ट्र राज्य सरकार पोलिस दलात विविध पदांसाठी साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार आहे. यामुळे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलिस दलात सहभागी होता येणार आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. 

कोरोनाकाळात पोलिसांनी केलेले अविश्रांत प्रयत्न आणि सर्व प्रकारच्या बंदोबस्तासाठी लागणारी गरज लक्षात घेता गेल्या काही वर्षांच्या रखडलेल्या भरतीचा प्रश्न मार्गी लागला आहे .आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल  12 हजार ५२ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व पदे शिपाई संवर्गातील असतील.राज्यात कित्येक वर्षांनी पोलिस भरतीचा निर्णय प्रत्यक्षात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केली. या निर्णयामुळे शिपायांची सर्व रिक्तपदे भरली जातील. 100 टक्के भरण्यात येत आहेत.

( संपादन - सुमित बागुल ) 

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे. आरक्षणातील गरजा लक्षात घेवूनच या नियुक्त्या केल्या जातील.
पोलिस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे भरली जाणार आहेत.

नव्या आयुक्तालयासाठी सोय 

मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलिस शिपाई संवर्गातील ५०५ पदे भरली जाणार आहेत. कोविडनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ४ मे २०२० नंतर अर्थ विभागाने नियुक्त्यांवर बंदी आणली होती. तसेच खर्चावरही नियंत्रण आणले होते. त्यात परिवर्तन करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या भरतीमुळे सुमारे १२० कोटींचा खर्च होईल.

anil deshmukh on maharashtra police department to recruitment more than twelve thousand candidates will be recruited

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com