esakal | मोठी बातमी : अजित पवार यांच्या उपस्थितीत 'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी : अजित पवार यांच्या उपस्थितीत 'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

खरंतर घनदाट यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश बरेच दिवस मागे पडला होता. घनदाट विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुक होते.

मोठी बातमी : अजित पवार यांच्या उपस्थितीत 'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे संचालक भरत घनदाट यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना अजित पवारांनी दोघांचं स्वागत केलंय. 

कोरोना काळात बरीच संकटं असताना अनेक राजकीय घटना घडतायत. मात्र महाविकास आघाडीत सगळे एकत्र काम करतायत. "याआधी घनदाट मामा यांना तिकीट हवं होतं, म्हणून ते आले होते. पण त्यावेळी आम्ही देऊ शकलो नाही."आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचं स्वागत करतो असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार म्हणालेत. 

सर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार - अनिल देशमुख

....म्हणून मागे पडलेला पक्षप्रवेश  

खरंतर घनदाट यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश बरेच दिवस मागे पडला होता. घनदाट विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुक होते. त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. बाबाजानी दुर्राणी यांनी देखील घनदाट यांच्या तिकिटासाठी  शब्द टाकून पहिला होता. मात्र त्यावेळचे विद्यमान आमदार मधुसूदन केंद्रे यांचं तिकीट कापून घनदाट यांना उमेदवारी देण्यात अडचणी येत होत्या. म्हणून घनदाट यांचा राष्ट्रवादी प्रवेश मागे पडला होता. आज अखेर त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झालाय.   

महत्त्वाची बातमी : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणारी CBI ची टीम परतली दिल्लीला, आता 'असा' होईल पुढील तपास

कोरोना काळात शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं महापाप 

येत्या काळात जिल्हापरिषद, तालुका पंचायत आणि सहकाराच्या निवडणुका आहेत. यंदा पावसाने मोठं नुकसान केलंय, तिथे सरकार लक्ष ठेऊन आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असताना त्यांना पैसे न मिळोत असं काम काम केंद्र सरकारने केलंय. परदेशात कांदा निर्यात होत असताना त्याचा चांगला दर शेतकऱयांना मिळत होता. पण त्याला थांबवण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. यामुळे केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचं सगळ्यांना दिसतंय. यावेळी केंद्राने कांडा निर्यात बंदीचा निषेध केलाय. काळ शरद पवार पियुष गोयल यांना भेटलेत. शरद पवारांनी त्यांना याबाबतचा निर्णय मागे घेण्यास सांगितलंय. सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांची मोठी अडचण झाली आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं महापाप केंद्राने केलंय. केंद्राने हे थांबवलं पाहिजे असंही अजित पवार म्हणालेत.

sitaram ghandat finally joined nationalist congress party in the presence of ajit pawar