Anil Deshmukh News I अनिल देशमुखांना दिलासा नाही; जेजे रुग्णालयात उपचार घ्या, कोर्टाचे निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh Latest Marathi News

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अर्जावर आज न्यायालयानं निर्णय सुनावला आहे.

अनिल देशमुखांना दिलासा नाही; जेजे रुग्णालयात उपचार घ्या

मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून शस्त्रक्रियेसाठी कोणताही दिलासा मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी जेजे रुग्णालयातच उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. उपचारा करताना घरातील एक व्यक्ती देशमुख यांच्यासोबत उपस्थित असणार आहे, न्यायालयाने तसे स्पष्ट केलं आहे. (Anil Deshmukh Latest Marathi News)

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अर्जावर आज न्यायालयानं निर्णय सुनावला आहे. देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती.

हेही वाचा: समाजाला हिंसक बनवण्याचा BJP अन् RSS चा प्रयत्न, सावंतांची टीका

जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र ईडीनं याला विरोध केला होता. ईडीनं देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं सांगणारा अहवाल कोर्टात सादर केला होता. तसेच खासगी ऐवजी जेजेतही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असाही ईडीनं दावा केला होता.

दरम्यान, कोट्यवधी रुपयांची अवैध वसुलीचा आरोप झाल्यानंतर, अनिल देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती. अनिल देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

हेही वाचा: मलिकांना तुर्तास दिलासा, खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी

Web Title: Anil Deshmukh Not Relieved By Court Treatment At Jj Hospital Orders From Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top