Nawab Malik Relief I मलिकांना तुर्तास दिलासा, खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Nawab Malik

मलिकांना तुर्तास दिलासा, खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. दरम्यान, आता मलिकांसंदर्भात एक वेगळी बातमी समोर येत आहे. नवाब मलिकांना न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे. मुंबईतील कुर्ल्यातील एका रुग्णालयात मलिकांवर उपचार होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मागील सुनावणी दरम्यान मलिकांच्या कोठडीत न्यायालयाकडून पुन्हा वाढ करण्यात आली होती. न्यायलयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु खासगी रुग्नालयात उपचार घेण्यासाठी त्यांना न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे. मुंबईतील कुर्ल्यातील एका रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. मलिक यांच्यासोबत परिवारातील एका व्यक्तीला उपचारादरम्यान उपस्थित राहायची मुभाही कोर्टाने दिली आहे.

हेही वाचा: गुडन्यूज! मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात

दरम्यना, प्रख्यात डॉन दाऊद इब्राहिम संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ईडीने नवाब मलिकांच्या विरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

या आगोदरही मलिक यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं होतं. ईडीकडून नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आठ दिवसांचीच कोठडी मंजूर केली होती.

हेही वाचा: देशातील जनता सुजाण, राज्यकर्ते चुकल्यास धडा शिकवते - शरद पवार

Web Title: Immediate Relief To Nawab Malik From Court Permission For Treatment In Private Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top