Anil Deshmukh I अनिल देशमुखांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार; NCP आमदाराचं मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political News

अनिल देशमुखांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार; NCP आमदाराचं मोठं वक्तव्य

शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. यामुळं आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नव्या वादांना तोंड फुटलं आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी आक्रमक झाली असून आमदार अमोल मिटकरी यांनी बोचरी टीका केली आहे. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासंदर्भात एक सूचक वक्तव्य केलं आहे. अनिल देशमुखांचे मंत्रिमंडळात लवकरच पुनरागमन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: जगात तिसरं महायुद्ध होईल! भारतावर आणखी 3 देश आक्रमण करतील; बाळुमामा भाकणुक

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी आम्हाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर भाजपाकडून कटकारस्थान करण्यात आलंय हे सर्वांना माहीत आहे. चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) स्पष्टीकरण देताना सचिन वाझे (Sachin Waze) सरड्याप्रमाणे कसा रंग बदलत आहे. परमबीर सिंगसारखा भ्रष्टाचारी माणूस देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाकडून आयीटी, ईडी (ED) कोणत्याही धाडी टाकल्या तरी काहीही होणार नाही. अनिल देशमुख लवकरात लवकर बाहेर येतील आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले, पक्षप्रमुखांच्या घरापर्यंत जर भाजप जात असेल तर, अशांपासून राज्य शाबूत ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीपासून महाराष्ट्र वाचवायला हवा हे पक्षप्रमुखांना माहित आहे. त्याच्यामुळे तानाजी सावंत यांना पक्षप्रमुख योग्य समजवतील. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेऊ नये असे पक्षाच्या सूचना आहेत. त्यामुळे जी व्यक्ती निष्पाप आणि निष्कलंक आहे, ज्यांना फक्त राजकीय बळी ठरवण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पूर्ण टीमनं केलं आहे, ते सर्व परत तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: 'उत्तर'साठी 'मातोश्री'वरून हलली सूत्रं; अस्लम सय्यद यांची माघार