esakal | ‘त्या’ दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल... ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे शांतता राखण्याचे आवाहन (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh tweet that action will be taken against the culprits in the Rajguru vandalism case

दादर येथील 'राजगृह' या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. याप्रकरणी सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

‘त्या’ दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल... ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे शांतता राखण्याचे आवाहन (Video)

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : दादर येथील 'राजगृह' या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. याप्रकरणी सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर मंगळवारी (ता. ७) सायंकाळी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृहाच्या आवारात घुसून सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक केली. दरम्यान, राजगृहाच्या आवारातील कुंड्यांचेही मोठे नुकसान केले आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. याबाबत, त्यांनी त्यांच्या फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सर्व नागरिकांनी शांतता राखावी. राजगृहावर दोघेजण आले हे खरे आहे. पोलिसांनी ताबडतोब यात लक्ष घातले. पोलिसांनी चोख काम केले आहे. त्यामुळे सर्व बांधवांनी शांतता राखावी. राजगृह आजूबाजूला कोणी जमू नये.

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध केला असून याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांमी म्हटलंयं की, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी आमची मागणी आहे. मी स्वतः भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
मुंबईच्या दादर परिसरात असलेले 'राजगृह' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी खास ग्रंथालय आणि अभ्यासासाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकरी अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारी दोन माथेफिरुंनी राजगृह येथे येऊन तोडफोड करण्याचा प्रकार केला.