
वसुली प्रकरण: अनिल देशमुखंच मुख्य आरोपी; ED ची हायकोर्टात माहिती
मुंबई : खंडणी वसुलीच्या आरोपात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख हेच या खंडणी वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान वसुलीतून जमा केलेले पैसे देशमुख यांनी बोगस कंपन्यांद्वारे वळवल्याचे तपासात समोर आले आहे. तर भ्रष्टाचाराच्या पैशांचा स्रोत काय याबाबत देशमुखांनी असमाधानकारक उत्तरे दिली आहेत. या प्रकरणाचे ईडीचे तपास अधिकारी तासिन सुलतान यांच्या पथकाने ५६ पानांचे हे प्रतिज्ञापत्रक मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. या पत्रात देशमुखांचा अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणातही थेट संबध असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: 'हिंदू दहशतवाद' हा शब्द शरद पवारांचं सर्वात मोठं पाप : सुनील देवधर
देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत. यामुळे देशमुखांची सुटका झाल्यास ते राजकीय वजन वापरून पुराव्यांशी छेडछाड करू शकतात असाही अंदाज ईडीने वर्तवला आहे. तसेच देशमुख हे तपासातही सहकार्य करत नसल्याने त्यांना जामीन देऊ नये, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
हेही वाचा: सुप्रिया सुळेंसोबतच्या व्हिडिओवर शशी थरूर यांचं स्पष्टिकरण, म्हणाले..
Web Title: Anil Deshmukh Was The Main Accused In The Recovery Case Ed In High Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..