कामगारांनी चुकीच्या दिशेने जाऊ नये ; अनिल परबांचे आवाहन

जे येणार नाहीत त्यांच्यावर प्रशासनाचा बडगा उचलावा लागेल.
Anil parab, Gopichand padalkar, Sadabhau Khot
Anil parab, Gopichand padalkar, Sadabhau KhotEsakal
Updated on

कोल्हापूर : एसटी कामगारांचे नेतृत्व कोण करतय याच्याशी आम्हाला काहीही घेणे देणे नाही. कामगारांनी भरकटू नये, चुकीच्या दिशेने जाऊ नये. राजकीय पक्षाने पोळी भाजावी मात्र पोळी करपणार नाही ह्याची काळजी घ्यावी असा टोला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत, (Sadabhau Khot) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांना अनिल परब(Anil Parab) यांनी लगावला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात कृती समिती आणि अनिल परब यांची आज बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एसटी कामगारांना पगारवाढ दिल्यानंतर राज्य शासनाने त्याची हमी घेतली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, जेष्ठ नेते शरद पवार या सर्वांच्या मदतीने राज्य सरकारने एसटी कामगारांना आर्थिक दिलासा दिला आहे. सातवा वेतन आणि दहा वर्षाचा करार याचाही विचार केला जाणार आहे. राज्य सरकार चार पावले पुढे येऊन भरघोस मदत करत आहे. विलगीकरणाचा मुद्दा सरकारच्या हातात नसून हाय कोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या हातात आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर इतर मागण्यांचा विचार विचार केला जाईल. असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

Summary

कामगारांनी संप मागे घ्यावा, एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. एसटी वाहतूक सुरळीत व्हावी. असे आवाहन परब यांनी केले.

पुढे ते म्हणाले, एसटी बंद ठेवणे हे सरकारला, एसटीला आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना परवडणारं नाही. संपामधून कामगारांना हजर राहण्याचे आवाहन करावे. तसेच संप मागे घेतल्यानंतर इतर बाबीवर चर्चा करायला तयार आहोत .'पैसे देऊनही संप सुरू राहिला तर पैसे न देता संप सुरू राहिला तर काय फरक पडतो'? असा विचार राज्य सरकार करू शकते. त्यामुळेच कामगारांनी संप मागे घ्यावा, एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. एसटी वाहतूक सुरळीत व्हावी. असे आवाहन परब यांनी केले.

Anil parab, Gopichand padalkar, Sadabhau Khot
पगारवाढीनंतरही संप सुरू ठेवल्यास वाढीबाबत पुर्नविचार करणार : परब

काही कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यासाठी उद्याची मुदत मागितली. आज रात्री विचार करून उद्यापर्यंत त्यांचा विचार केला जाईल. जे येणार नाहीत त्यांच्यावर प्रशासनाचा बडगा उचलावा लागेल. पगारवाढ देऊन ही जर संप सुरूच ठेवला तर पगारवाढीबाबत विचार करू असा गर्भित इशारा त्यांनी दिला. संप मागे घेऊन पुन्हा कामावर हजर राहण्याचे आवाहनही परब यांनी केले. आज 500 कर्मचार्‍यांच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे. असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com