माझे राजकारण संपवण्याचे अनिल परब यांचे षडयंत्र; रामदास कदम यांचा आरोप

दिनेश चिलप मराठे
Ramdas Kadam VS Anil Parab
Ramdas Kadam VS Anil Parabgoogle

मुंबादेवी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो की मी भाजपाचे किरीट सोमय्या (BJP Kirit somaiya) यांच्याबरोबर कधीही कुठल्याही विषयावर बोललो नाही किंवा संपर्क केलेला नाही. हे सर्व अनिल परब (Anil Parab) यांचे षडयंत्र आहे. माझे राजकारण संपववण्याचा कट (political career Machination) अनिल परब यांनी रचला असल्याचा आरोप शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम (Ramdas kadam) यांनी केला. मुंबई प्रेस क्लब (Mumbai Press club) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत (press conference) त्यांनी हे आरोप केले. उध्दव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालावे ही विनंती करत, मी शिवसेना कधीच सोडणार नसल्याचेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ramdas Kadam VS Anil Parab
माझगावातील हवा दिल्लीपेक्षा प्रदूषित; हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३५८ वर

गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला जे बदनाम करण्याचं कटकारस्थाने सुरु आहे. ज्या कथित ऑडिओ क्लिप बद्दल मला विचारणा होत आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो की किरीट सोमय्या यांच्याबरोबर मी कधीही कुठल्याही विषयावर बोललो नाही किंवा त्यांच्यासोबत संपर्क केलेला नाही. या आरोपामागे अनिल परब आहेत. अनिल परब यांच्याकडे रत्नागिरी जिल्हाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे, मात्र वर्षभरात ते केवळ 26 जानेवारी व 15 ऑगस्टला जिल्ह्यात येतात. इतर दिवशी त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचे काहीही पडलेलं नसते असही कदम यांनी म्हटले.

दापोली व खेड मतदारसंघात अंत्यत कष्टाने व हिंमतीने आम्ही शिवसेना उभी केली. त्या मतदार संघात अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे संजय कदम व वैभव खेडेकर यांना पक्षात घेऊन, माझा मुलगा योगेश कदम याचं तिकीट कापण्याचा डाव परब यांचा आहे. असा आरोपही कदम यांनी केला. माझे राजकारण संपवण्याचा डाव परब यांचे आहे. अनिल परब यांच्या विरुद्ध मी बोललो तर पक्षाविरोधात बोलल्याचा चित्र उभ केलं जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हात जोडून अशी कळकळीची विनंती करतो की यांनी या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालावे व माझ्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी विनंती कदम य़ांनी पत्रकार परिषदेत केली.

मला कधी कधी प्रश्न पडतो की पक्षप्रमुख नक्की कोण आहे. उद्धव साहेब आहे की अनिल परब, कारण कुठल्याही कामाबद्दल मी जर मातोश्रीवर फोन केला तर अनिल परब यांना विचारतो, अस सांगण्यात येत असल्याचे रामदास कदम म्हणाले. उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. मी कालही भगव्या झेंड्याचा शिपाई होतो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे या शब्दात रामदास कदम यांनी शिवसेना सोडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com