esakal | 'मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांचा नोकरीचा प्रश्‍न मार्गी लागेल'
sakal

बोलून बातमी शोधा

maratha reservation

'आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांचा नोकरीचा प्रश्‍न मार्गी लागेल'

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातील एकाला एसटीत नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार आतापर्यंत ९ जणांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली आहे. उर्वरित तरूणांचे अर्ज छाननीत असून प्रत्येकाला नोकरी मिळेलच, असे शुक्रवारी (ता. १६) औरंगाबादेत परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. परिवहनमंत्री अनिल परब हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शहरात आल्यानंतर त्यांनी एसटी महामंडळाच्या चिकलाठाणा कार्यशाळेस भेट देत माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले, ‘मराठा आरक्षणातील बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांच्या नोकरीच्या प्रश्‍नासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांना पत्र पाठवलेले आहे. आम्हाला गृह विभागातर्फे (होम डिपार्टमेट) क्लिअरंन्स येत आहे. त्यांना नोकरी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत नऊ जणांना एसटी महामंडळात नोकरी मिळाली आहे. इतरांच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. उर्वरितांच्या अर्जांची छाननी चालू आहे. यात प्रत्येकाला नोकरी मिळेल, असे मी आश्‍वासन देतो, असेही अनिल परब यांनी सांगितले.

हेही वाचा: Clubhouse चे मेसेजिंगसाठी 'Backchannel' हे भन्नाट फिचर लाँच

औरंगाबादेतील तिघांना नोकरी-
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांपैकी तिघा जणांना एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात नोकरी मिळाली आहे. यात रवी केशव चौधरी यांना लिपीक, सुनील कारभारी शेळके हे वाहक तर भगवान जगन्नाथ सोनवणे यांना स्वच्छक म्हणून नोकरी मिळाली आहे. तसेच गल्ले बोरगाव येथील किशोर हरदे यांचा भाऊ कल्याण हरदे आणि उमेश एंडाईत यासह इतर लोक प्रतिक्षेत आहेत.

loading image