वन्यजीव प्रगणनेला महाराष्ट्रातूनच सुरुवात, सलग दुसऱ्या वर्षीही वन्यजीव मोजणीला ब्रेक

wildlife census
wildlife censuswildlife census

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बुद्धपोर्णिमेला (buddha purnima 2021) दरवर्षी होणारी वन्यजीव संख्या अंदाज पद्धतीला (वन्यजीव प्रगणना) (animal counting on buddha purnima) सलग दुसऱ्या वर्षीही ब्रेक लागला. यात वन्यजीव आणि जंगलाची आवड असलेली शेकडो वारकरी सहभागी होत असतात. यातूनच वन्यजीव व वन संरक्षकांचे समर्थक राज्यात तयार झालेत. या जुन्या पद्धतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असले तरी सर्वसामान्यांचे जंगलाचे नाते जोडण्यासाठी उपयोगी ठरत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे बुद्धपोर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजीव संख्याशास्त्रासाठी वापर करण्याची कल्पना कधीतरी महाराष्ट्रातील वनखात्याला सुचली आहे. (animal counting stop on buddha purnima in second year also due to corona)

wildlife census
corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

राज्यातील काही व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात याला उत्सवाचे स्वरूप दिले होते. यात सहभागी होणाऱ्यांकडून फाउंडेशनच्या नावाखाली विविध उपक्रम राबवून पैसे गोळा केले जात होते. यंदाही मोजणी असती तर कदाचित ते निलंबित असल्याने ती पद्धत बंद पडली असती. यामुळे मात्र यात पैसा असलेले व्यक्तीच निसर्ग प्रेमींच्या नावाखाली मोजणीमध्ये बसत असत. त्यांनीच या मोजणीला गालबोट लावले होते. त्यामुळेच काही वर्षापूर्वी एका मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी माध्यमांना प्रसिद्धी पत्रक पाठविले होते. त्यात वन्यजीव गणनेत सहभागी होणाऱ्यांनी दारू पिऊन मचाणावर बसू नये. असे आढळल्यास प्रगणकावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तोच मुख्य वनसंरक्षकानंतर मेळघाटमध्ये गेला त्याने पैसे आकारून वन्यजीव मोजणीत सहभागी होण्याच्या उत्सव सुरू केला होता. या पद्धतीवर वन्यजीव प्रेमी, निसर्गप्रेमींनी आक्षेप घेतलेत. माध्यमांमध्ये ती नाराजीही उमटली होती. मात्र, प्रशासकीय वरदहस्त असल्याने त्यांची मनमानी सुरूच होती. यातूनच या मोजणीवर अनेकांनी प्रश्न निर्माण केले. या प्रगणनेच्या निकालाची अपेक्षा न करता केवळ पर्यटन म्हणून या उपक्रमाकडे पाहणे अयोग्य आहे. यातून युवावर्ग निसर्गाचे तारकही ठरू पाहत आहेत.

प्रगणनेतून तयार झाले अभ्यासक -

बुद्धपोर्णिमेच्या वन्यप्राणी प्रगणनेमध्ये राज्यातील निसर्गप्रेमी व वन्यजीव प्रेमी युवा वर्ग गेल्या दोन दशकापासून मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ लागला. हे निमित्त साधून या वर्गालाही वन्यप्राण्यांच्या क्षेत्रांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यातूनच या प्रगणनेला शासनमान्यता सोबतच समाज मान्यताही मिळाल्याने सर्वसामान्य निसर्ग प्रेमीच निसर्ग संरक्षणाचा वारकरी झाला.

पावलाचे ठसे आणि पाणवठ्यावरील वन्यप्राणी गणनेतून ठरविण्यात येणाऱ्या वाघांच्या आकडेवारी व शाश्वत पद्धतीने ठरविलेल्या आकडेवारीवरून वाद झाल्याने ही पद्धत बाद केली. आता कॅमेरा ट्रॅप, ट्रान्झिट लाईन या शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येतो. त्यातून वाघांसह तृणभक्षक प्राण्यांची संख्या आणि घनताही मोजली जाऊ लागली आहे. या पद्धतीला शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व नसले तरी यातून मोठ्या प्रमाणात अभ्यासक, शास्त्रज्ञ, संवर्धकही तयार झालेले आहेत.
-किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com