संत तुकाराम हे... बागेश्वर महाराज बरळले, सोशल मीडियावरुन संतापाची लाट

संत तुकाराम हे... बागेश्वर महाराज बरळले, सोशल मीडियावरुन संतापाची लाट

बागेश्वर महाराज चमत्काराच्या मुद्द्यावरुन चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणी त्यांना नागपूर पोलिसांनी क्लिनचिट देखील दिली आहे. दरम्यान बागेश्वर महाराज यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. आधी चमत्काराचा दावा आता आक्षेपार्ह विधान त्यामुळे बागेश्वर महाराजांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

"महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी रोज मारत असत. त्यांना रोज काठीने मारत होते. यावेळी त्यांना कोणीतरी विचारले तुम्हाला पत्नी मारते, तुम्हाला काहीच वाटत नाही का. तर तुकाराम महाराज म्हणाले, देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या चक्करमध्ये पडलो असतो. पण मारणारी पत्नी मिळाली तर मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची," असे वादग्रस्त विधान बागेश्वर महाराजांनी केले. त्यामुळे त्यांचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, बागेश्वर महाराजचा जाहीर निषेध झाला पाहीजे. असं बोलणे चुकीचे आहे. चांगले भारतीय संस्कार आहेत म्हणून लोक आध्यात्माकडे वळतात. तुकाराम महाराजांवरील वक्तव्याचा सर्व समाजातून निषेध झाला पाहिजे. 

संत तुकाराम हे... बागेश्वर महाराज बरळले, सोशल मीडियावरुन संतापाची लाट
अंबानींचा विषय वेगळा.. साखरपुड्यात लावलेल्या 'कार्टियर पैंथर ब्रोच' चाही आहे इतिहास

भाजपचे आध्यात्मीक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी देखील बागेश्वर महाराज यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले संत तुकाराम आणि त्यांच्या धर्म पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. 

संत तुकाराम हे... बागेश्वर महाराज बरळले, सोशल मीडियावरुन संतापाची लाट
समाजवादी पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित; शिवपाल यादव यांच्याकडे मोठी जबाबदारी

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बागेश्वर महाराज यांच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखल केलेला अर्ज नागपूर पोलिसांकडून दप्तरी दाखल केला होता. पोलिसांनी नागपूरमधील दरबाराचं ६ तासांचं फुटेज तपासलं त्यात कुठेही अंधश्रद्धा पसरवली जाते असं आढळलं नाही. त्यामुळ पोलीस दखलपात्र गुन्हा दाखल करणार नाहीत असं नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय.

संत तुकाराम हे... बागेश्वर महाराज बरळले, सोशल मीडियावरुन संतापाची लाट
Pune BJP : कसबा निवडणुकीत भाजपकडून आचारसहिंतेचा भंग

रोहित पवार म्हणाले, "बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं… तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!"

बागेश्वर महाराजांविषयी थोडक्यात-

बागेश्वर महाराज मध्यप्रदेशातल्या छतपूर जिल्ह्यात राहतात. बागेश्वर दरबारात लाखोंनी भाविक आपल्या समस्या घेऊन जातात. धीरेंद्र शास्त्री हे जगभरात बागेश्वर धाम सरकार (महाराज) नावाने प्रसिध्द आहेत. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतात. युट्युब वर देखील लाखोंनी लोक त्यांना ऐकतात. बऱ्याच ठिकाणांहून कथा करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. नागपूरमध्ये त्यांची कथा १३ जानेवारीपर्यंत होणार होती. पण ते ११ जानेवारीलाच तिथून निघून गेले. त्यानंतर वाद पेटला.

त्यांच्या विषयी सांगितलं जातं की, ते लोकांच्या मनातलं ओळखू शकतात. एवढंच नाही तर ते त्यांच्या दरबारात येणाऱ्या लोकांच्या फोनचा नंबर, घरात ठेवलेल्या वस्तूंविषयीपण सांगतात. त्यांच्या या गोष्टी सगळ्यांसमोर सिध्द करण्याचं आव्हान अंनिस ने त्यांना दिलं होतं. याविषयी देशभरात वाद उठला होता.

संत तुकाराम हे... बागेश्वर महाराज बरळले, सोशल मीडियावरुन संतापाची लाट
हिंदू आक्रोश करतायत मग अपयश कोणाचं? मोदींच्या कार्यकाळावर बोट ठेवत ठाकरे गटाचा सवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com