Anjali Damania Accuses Dhananjay Munde of ₹142 Crore Scam: कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी १४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा मोठा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी यासंदर्भातील गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या आरोपानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.