

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भूमिका मांडली आहे. दमानिया यांनी धनंजय मुंडेंचा केवळ राजीनामा न घेता त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सगळे पुरावे देऊनसुद्धा जर काही कारवाई होत नसेल तर सामान्य लोकांना न्याय कसा मिळणार,असे म्हणत अंजली दमानियांना अश्रू अनावर झाले.