
Anjali Damania: मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन पाच महिने उलटले तरी धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला सोडला नाही. सातपुडा बंगल्याची धनंजय मुंडेंकडे ४२ लाखांची थकबाकी असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. आरोप-प्रत्यारोप होऊन चार दिवस लोटले तरी सरकारने अद्याप कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता अंजली दमानिया यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस धाडली आहे.