
Anjali Damania Allegation on Dhananjay Munde Marathi News : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा चौकशीच्या फेऱ्यात आल्यानंतर आता कराडचे जवळचे संबंध असलेल्या मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी भर पडत असल्याचं चित्र आहे. कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणात आणखी गंभीर आरोप केला आहे. तसंच सरकारी कंपनीकडून धनंजय मुंडे यांना आर्थिक फायदा कसा काय होतो? असा सवाल करत त्यांनी काही कागदपत्र सादर केली आहेत.