
विधानसभेच्या मतदानाच्यादिवशी बीड जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर तोडफोडीच्या घटनांचे व्हिडिओ त्याच दिवशी समोर आले होते. तरीही निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही असं निवडणूक आयोगानं यावरील तक्रारी निकाली काढताना म्हटल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं.
पण आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच २०२४ ची विधानसभेची निवडणूक मुक्त अन् निष्पक्ष होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.