
परळी विधानसभा निवडणुकीत घडलेल्या गोंधळावर ८२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.