

उपळाई बुद्रूक: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अंजनगाव खेलोबा येथे निर्माण झालेला तणाव तिसऱ्या दिवशीही कायम असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने कसोशीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी पाच प्रतिनिधींसोबत मोहोळ पोलिस ठाण्यात सायंकाळी सुमारे सात वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विशेष पोलिस महानिरीक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती.