Social activist Anna Hazare criticizes AAP leader Arvind Kejriwal: दिल्लीत विधानसभेची निवडणूक पार पडते आहे. सकाळपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. दिल्लीतील ७० जागांसाठी ही निवडणूक पार पडत असून एकूण १ कोटी ५६ लाख मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. मात्र, दिल्लीत मतदान सुरु असतानाच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.