
Anna Hazare: देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दहा वाजता निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश विदेशातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शोक व्यक्त करताना म्हटलं की, देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान होतं असं म्हटलंय.