Anna Hazare Slams Government Decision
esakal
पारनेर, ता. 26: देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून जनतेसाठी मी अनेक कायदे सरकारला करण्यास भाग पाडले मात्र मी सरकारकडून एक रुपया घेतला नाही. सध्या मी वापरत असलेली गाडी सुद्धा मला जनतेने लोक वर्गणी करून घेऊन दिली आहे. आता मात्र सरकारने लोकपाल सदस्यांना अतिशय महागड्या अशा आलिशान गाड्या देण्याचे ठरवले आहे याचे मला आश्चर्य वाटते. अश्या महागड्या गाड्या त्यांना देण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल सदस्यांना गाड्या देण्यावरून 'सकाळ'शी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली.