Anna Hazare Threatens Indefinite Hunger Strike Over RTI Act Amendments
esakal
मार्तंड बुचुडे
पारनेर : माहिती अधिकार कायद्याची परिणामकारकता कमी करणाऱ्या प्रस्तावित दुरुस्त्या तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिला आहे. माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित दुरुस्त्या तसेच शुल्कवाढीबाबत हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.