
संभाजीराजेंच्या भूमिकेकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना शिवसेनेनं दबावाचं राजकारण खेळायला सुरुवात केलीय.
शिवबंधन बांधण्यासाठी 'मातोश्री'वर या, ठाकरेंच्या निरोपानंतर वाटाघाटी?
मुंबई : छत्रपती संभाजीराजेंना खासदार व्हायचं असेल, तर त्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) पक्ष प्रवेश करावा. उद्या दुपारी 12 वाजता त्यांनी शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर (Matoshri) यावं, अशी अटच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घातलीय. शिवसेनेच्या अटीनंतर संभाजीराजेंच्या भूमिकेकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना शिवसेनेनं दबावाचं राजकारण खेळायला सुरुवात केलीय.
जर संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंच्या निरोपाला प्रतिसाद दिला नाही, तर शिवसेना पक्ष निष्ठावान कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला राज्यसभेची उमेदवारी देईल. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातल्या कट्टर शिवसैनिकाचा राज्यसभेसाठी विचार होऊ शकतो, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून समोर आलीय.
त्यातच आता राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेवरुन निर्माण झालेला तिढा अद्याप कायम असून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेनं दिलेल्या पक्ष प्रवेशाची अट फेटाळून लावल्याची माहिती समोर आलीय. संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) हाती शिवबंधून बांधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवावी, अशी ऑफर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. पण, त्यास संभाजीराजेंनी नकार दिल्याची माहिती आता समोर आलीय.
हेही वाचा: दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका संगीता साजिथ यांचं निधन
सुत्रांच्या माहितीनुसार, संभाजीराजेंना उद्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर शिवबंधन (Shivbandhan) बांधण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. पण, ते संभाजीराजेंनी नाकारल्याचं कळतंय. त्यामुळं सहाव्या जागेचा तिढा आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती अजूनही आपण शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करावी, या अटीवर ठाम असल्याची माहिती समोर आलीय.
Web Title: Announce My Name As A Candidate Of Shiv Sena Sponsored Mahavikas Aghadi Sambhajiraje Chhatrapati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..