ब्रेकिंग! सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांची प्रतीक्षा यादी जाहीर; 'वनसेवे'च्या पसंतीक्रमास मुदतवाढ 

तात्या लांडगे
शुक्रवार, 10 जुलै 2020

2017 मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2017 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांची परीक्षा घेतली होती. मात्र, न्यायालयीन प्रकरणामुळे प्रतीक्षा यादी लांबवली होती. आता आयोगाने या 101 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर केली असून त्यामध्ये 49 मुलींचा समावेश आहे. दरम्यान, इतर मागास वर्ग (खेळाडू), अनुसूचित जाती (खेळाडू) अशा पदांवरील शिफारशी राखून ठेवून ही यादी जाहीर केली आहे. या पदांसाठीच्या पात्रतेची तपासणी, प्रमाणपत्रांची वैधता आणि अर्जातील दावे, यांची वैधता तपासणी तसेच समांतर आरक्षण आणि न्यायालयीन प्रकरणांवरील न्याय निर्णयाच्या अधिन राहून आयोगाने ही यादी प्रसिध्द केली आहे. 

सोलापूर : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी 2017 पासून प्रलंबित असलेली 101 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी शुक्रवारी (ता. 10) आयोगाने प्रसिध्द केली. त्यामध्ये 12 जणांना 186 गुण असून एकूण विद्यार्थ्यांमध्ये 49 मुली आहेत. 

'वनसेवे'चे पसंतीक्रम निवडण्याची 17 जुलैची मुदत 
राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल 19 जूनला जाहीर झाला असून त्यामध्ये 420 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही उमेदवारांनी वनसेवेचा पसंतीक्रम निवडला आहे. आयोगाच्या निर्दशनास आल्याने आता आयोगाने अशा विद्यार्थ्यांसाठी पसंतीक्रम निवडण्यासाठी 17 जुलैची मुदत दिली आहे. वनसेवेच्या मुलाखती 4 ते 21 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. दरम्यान, ज्या क्रमाने पदांचा तपशिल दर्शविला आहे, त्यानुसार पदांचा पसंतीक्रम गृहीत धरला जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

2017 मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2017 मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांची परीक्षा घेतली होती. मात्र, न्यायालयीन प्रकरणामुळे प्रतीक्षा यादी लांबवली होती. आता आयोगाने या 101 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर केली असून त्यामध्ये 49 मुलींचा समावेश आहे. दरम्यान, इतर मागास वर्ग (खेळाडू), अनुसूचित जाती (खेळाडू) अशा पदांवरील शिफारशी राखून ठेवून ही यादी जाहीर केली आहे. या पदांसाठीच्या पात्रतेची तपासणी, प्रमाणपत्रांची वैधता आणि अर्जातील दावे, यांची वैधता तपासणी तसेच समांतर आरक्षण आणि न्यायालयीन प्रकरणांवरील न्याय निर्णयाच्या अधिन राहून आयोगाने ही यादी प्रसिध्द केली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announced waiting list for Assistant Motor Vehicle Inspector posts