Appasaheb Dharmadhikari : यंदाच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे मानकरी आप्पासाहेब धर्माधिकारी कोण?

आज आपण या पुरस्काराचे मानकरी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
Appasaheb Dharmadhikari
Appasaheb Dharmadhikarisakal
Updated on

Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या संदर्भात घोषणा केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. 

आज आपण या पुरस्काराचे मानकरी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. (Appasaheb Dharmadhikari maharashtra bhushan award has been announced by cm eknath shinde )

आप्पासाहेब धर्माधिकारी कोण?

दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करतात. त्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा घेतलाय. वडील नानासाहेब धर्माधिकारीही एक उत्तम प्रबोधनकार होते. १९४३ पासून त्यांनी कार्याची सुरुवात केली.

आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य श्री आप्पासाहेब करतात. श्रवण बैठकांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं कार्य धर्माधिकारी कुटूंब करताहेत.१४ मे १९४६ रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म झाला आणि गेल्या ३० वर्षापासून निरुपण ते करत आहेत. त्यांना चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीने सन्मानित झाले.

Appasaheb Dharmadhikari
Eknath Shinde : अनेकांनी धमकी दिली पण वरळीतून मी एकटाच गेलो होतो; शिंदेंनी सांगितली आठवण

वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय.

त्यांच्या या कार्याला आता त्यांचा मुलगा सचिनदादा धर्माधिकारी पुढे नेत आहे. गेल्या आठ दशकांपासून त्यांचं कुटूंब हे समाज प्रबोधनाचं काम करत आहे.

Appasaheb Dharmadhikari
Maharastra Kesari: विशाल बनकर Vs पृथ्वीराज पाटील; कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीची गदा?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पुरस्कार काही प्रमुख क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो. जसे की आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा विषेश पुरस्कार प्रदान केल्या जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.