केंद्राकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन; ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज

Appeal from Central Government to apply for National Teacher Award
Appeal from Central Government to apply for National Teacher Award

विद्यार्थ्याच्या जडघडणीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे असते. विद्यार्थी घडावा म्हणून अनेक शिक्षक शाळेत वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून स्वयंसेवी संस्था, सरकार विविध पुरस्कार देते. केंद्र सरकारही राष्ट्रीय पुरस्काराने शिक्षकांना सन्मानित करते. असाच पुरस्कार देण्यासाठी शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.


शिक्षक दिनानिमित्त सरकार दरवर्षी शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरुपात पुरस्कार देते. केंद्र सरकारने 2019- 20चा पुरस्कार देण्यासाठी शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. ६ जुलैपर्यंत इच्छुक शिक्षकांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. https://mhrd.gov.inआणि https://nationalawardstoteachers.mhrd.gov.inया संकेतस्थळांवर या पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. इच्छुक मुख्याध्यापक व शिक्षकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे म्हटले आहे. 


देशातील उत्कृष्ट शिक्षकांचे विद्यार्थ्यांना घडवण्याचे योगदान व त्यांची ओळख देशाला व्हावी व त्यांचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.  पुरस्कार दिल्याने अनेक शिक्षकांनाही प्रेरणा मिळते व ज्यांचे चांगले काम आहे त्यांनाही प्रोत्साहन मिळते. त्यांची कार्याची दखल घेऊन सरकार उत्कृष्ठ काम कणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देते. उत्कृष्ठ काम करणाऱ्या शिक्षकांमुळे फक्त शालेय शिक्षणाची गुणवत्ताच नाही तर विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते. भारत सरकारच्या मानव संसाधान विकास मंत्रालयाने हे पुरस्कार देण्यासाठी इच्छुक शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

असे करा अर्ज
- https://nationalawardstoteachers.mhrd.gov.in या संकेतस्थळावर क्लिक करावे. 
-  Click on New Registration येथे क्लिक करावे.
- त्यानंतर Fill the Basic Informaiton भरावी.
- त्यानंतर Click Submit येथे क्लिक करावे.
- त्यानंतर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
- मोबाईल नंबर टाकून लॉगीन करावे त्यानंतर युझर नेम आणि पासवर्ड तयार करुन घ्यावा.
- त्यानंतर तिथे विचारलेली संपूर्ण माहिती भरावी. पूर्ण माहिती भरल्यानंतर सबमीट करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com