पूर्वजांच्या स्मरणार्थ द्या मदतीचा हात!; कोरोना मदत प्रकल्पासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्‍सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. बेड व व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे कोरोना रुग्णांचे जीव जात आहेत. त्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे - पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अनेक लहान-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, कोरोनामुळे सर्व नियमांचे पालन करून घरगुती पद्धतीने सर्वजण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत आहेत. यंदा पितृपक्षात समाजविधायक ‘कोरोना मदत प्रकल्प’ या उपक्रमाला सढळ हाताने मदत करून आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करू शकता.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे शहर व जिल्हा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्‍सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. बेड व व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे कोरोना रुग्णांचे जीव जात आहेत. त्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन एक जीव वाचवा...
शासकीय, खासगी रुग्णालयांना व कोविड केअर सेंटरला ऑक्‍सिजन सिलिंडर व व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून समाजातील सर्व घटकांना, दानशूर व्यक्तींना, स्वयंसेवी संस्थांना, खासगी आस्थापनांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले. आहे.

येथे करा आर्थिक मदत
सकाळ रिलीफ फंड
HDFC Bank A/C No : ५७५०००००४२७८२२
IFSC : HDFC००००१०३
या खात्यावर रक्कम ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून देणगी देऊ शकता.

www.sakalrelieffund.com या संकेतस्थळावर जाऊन ‘डोनेट नाऊ’वर क्‍लिक करून डेबिट वा क्रेडिट कार्डच्या साह्याने आपली देणगीची रक्कम पाठवू शकता. ‘सकाळ रिलीफ फंडा’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.

कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य
कोरोना विषाणूच्या संकटाविरोधात सर्व जग एकवटले असून भारतातही या साथीचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. अशावेळी दानशूरांनी मदतीचा हात पुढे करणे आवश्‍यक असते. ‘सकाळ रिलीफ फंड’ अशा कोणत्याही संकटाच्या काळात नेहमीच पुढाकार घेत आला आहे. यावेळीही अत्यावश्‍यक सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना बळ देतानाच आवश्‍यक तिथे जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यात पुढाकार घ्यायचे ‘सकाळ रिलीफ फंडा’ने ठरविले आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या, आस्थापनांना ऑनलाइन आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समाजातील सर्व घटकांतील नागरिकांनी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ४० लाखांचा निधी दिला. या निधीतून विविध गरजू नागरिकांसह विद्यार्थ्यांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. शासकीय व खासगी रुग्णालयांना सुरक्षिततेच्या साधनांचे वाटप केले. तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनास महापालिका कक्षेतील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्यासाठी व सुरक्षिततेच्या साधनांची मदत केली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘सकाळ रिलीफ फंडा’चे मदतकार्य
१)     कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरणारी विविध प्रकारची १६ लाख रुपये किमतीची औषधे ससून रुग्णालयाला प्रशासकीय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत वितरित केली.
२)     कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेसाठी पूना हॉस्पिटल, रत्ना मेमोरिअल हॉस्पिटल व जोशी हॉस्पिटल यांना हवेतील विषाणू नष्ट करणारी प्रमाणित प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीचे कोरोलॉन डिॲक्‍टिव्हेशन डिव्हाईस मशिनचे वाटप केले.
३)     पुणे महापालिका प्रशासनास वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी पाच लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत.
४)     पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनास तीन लाख रुपयांची सुरक्षिततेची साधने प्रदान. (सॅनिटायझर, मास्क, थर्मामीटर इत्यादी)
५)     विविध कोवीड केअर सेंटर व काही खासगी रुग्णालयांना सुरक्षिततेसाठी एक लाख ४१ हजार रुपये किमतीचे सॅनिटायझर स्टॅण्ड व सॅनिटायझर देण्यात आले. आणखी काही रुग्णालयांना वाटप करणार आहे.
६)     पुण्यात अडकलेली नागालॅंड येथील मुले, गरीब शालेय विद्यार्थ्यांचे कुटुंबीय, निगडी येथील अंध कुटुंब, सिंहगड रस्ता परिसरातील गरजू कुटुंब (मूर्ती कारागीर, बिगारी कामगार), भूगाव येथील बांधकाम साइटवरील मजुरांना एकूण तीन लाख ५१ हजार रुपये किमतीचे अन्नधान्य किटचे वाटप केले.
७)     माजी विद्यार्थी मंडळ- विद्यार्थी सहाय्यक समितीतर्फे लॉकडाउनच्या काळात गरीब, निराधार, मजूर व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या अन्नदान उपक्रमासाठी दोन लाख ५० हजार रुपये ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून मदत करण्यात आली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal from Sakal Relief Fund for Corona Relief Project