मराठी भाषा विकासाबाबतच्या नियुक्‍त्या रखडल्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 24 July 2020

राज्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा विकास विभाग असला तरी त्यातंर्गत असणारी विविध मंडळे आणि समित्या नवीन सरकार आल्यानंतरदेखील स्थापन होऊ शकलेली नाहीत. भाषा विकास विभागाने साहित्य आणि भाषेच्या संबंधित कोणत्याही नवीन नियुक्‍त्या केलेल्या नाहीत. राज्य मराठी विकास संस्थेतील नियामक मंडळातील अशासकी सदस्यांचा कालावधी तर २०१९ मध्येच संपला आहे.

मुंबई - राज्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा विकास विभाग असला तरी त्यातंर्गत असणारी विविध मंडळे आणि समित्या नवीन सरकार आल्यानंतरदेखील स्थापन होऊ शकलेली नाहीत. भाषा विकास विभागाने साहित्य आणि भाषेच्या संबंधित कोणत्याही नवीन नियुक्‍त्या केलेल्या नाहीत. राज्य मराठी विकास संस्थेतील नियामक मंडळातील अशासकी सदस्यांचा कालावधी तर २०१९ मध्येच संपला आहे;

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र अद्याप नविन नियुक्‍त्या तर नाहीतच शिवाय गेले वर्षभर समितीची बैठक देखील नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. नवीन सरकार आल्यानंतरदेखील मोरे यांनी राजीनामा दिला होता. मात्र त्यांना मुदत देण्यात आली. काल त्यांनी पुन्हा आपला राजीनामा दिला आहे.

मात्र अद्याप तो स्वीकारण्यात आलेला नाही. या मंडळांतील ३५ सदस्यांची मुदत तीन वर्षांची असल्याने मंडळ बरखास्त होणार नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी या वर्षी २ जानेवारीला राजीनामा दिला असून, तो स्वीकारण्यातदेखील आला आहे; मात्र या पदावर नवीन नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. राज्य मराठी विकास संस्थेतील नियामक सदस्यांची मुदत तीन वर्षांची असते. ही मुदत २०१९ मध्ये संपली आहे. गेल्या वर्षीपासून या समितीची बैठक झालेली नसल्याची माहिती समितीचे 
सदस्य अमर हबीब यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointments for Marathi language development stalled