पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यास मंजुरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई  - पुण्याला "आयटी हब' अशी ओळख प्राप्त करून देणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कला वाहतुकीच्या समस्येतून मुक्‍तीचा मार्ग आज राज्य सरकारने मंजूर केला. हिंजवडी ते शिवाजीनगर व्हाया बाणेर या मेट्रो मार्गाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. तब्बल 7500 कोटी रुपयांचा व 23.5 किमी लांबीच्या या मार्गावरील मेट्रोचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि रामवाडी ते वनाज या मेट्रो मार्गानंतर आता तातडीने हिंजवडी ते शिवाजीनगर या वर्दळीच्या भागात मेट्रो उभारण्यास सरकारने मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीची (पीएमआरडीए) बैठक आज मुंबईत पार पडली. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडून या मार्गाचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे. 

बापट म्हणाले, ""नुकत्याच पार पडलेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. घोषणेला फक्त तीन दिवसच उलटले असताना हा "सुपरफास्ट' निर्णय घेऊन पुणेकरांना नववर्षाची भेट दिली आहे.'' 

हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क येथे दोन लाख कर्मचारी वर्ग प्रत्यक्षपणे कार्यरत आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुचाकी आणि चारचाकी अशी मिळून सुमारे 1.5 ते 2 लाख वाहनांची वर्दळ या मार्गावर असते. तर सार्वजनिक आणि खासगी अशा एकूण 885 बसेस याच मार्गावरून येत-जात असतात. वास्तविक पाहता, पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची एकूण वार्षिक उलाढाल 1500 कोटी इतकी आहे. त्यापैकी तब्बल 50 टक्के (750 कोटी) उपन्न हे फक्त हिंजवडी आयटी पार्कमार्फत प्राप्त होते. असे असतानाही येथे पायाभूत सुविधांची वानवा जाणवत होती. या मार्गावर 23 स्थानके उभारण्यात येणार आहेत. या संपूर्ण मेट्रो मार्गाच्या उभारणीचे आज मुख्यमंत्र्याच्या समोर सादरीकरण करण्यात आले. या वेळी पुणे मेट्रोच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approved the third phase of the Metro Pune