

Arabian Sea Low Pressure Area Maharashtra Rain Alert
esakal
Southwest Arabian Sea Weather Update : नैऋत्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, आज (ता. २०) या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली सोमालियाच्या किनाऱ्याकडे सरकण्याचे संकेत आहेत. दरम्यान, राज्यात उन्हाचा चटका कायम असून, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.