
Jayant Patil : जयंत पाटलांचं एक स्मितहास्य अन् कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांनाही आवरेनात; सांगलीत राडा
सांगलीः सांगलीमध्ये आज पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ झाला. परंतु यावेळी हुतात्मा गटाचे कार्यकर्ते भलते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांकडे बघून जयंत पाटलांनी स्मितहास्य केल्याने लोक चांगलेच आक्रमक झाले.
त्याचं झालं असं की, आज जयंत पाटील सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीतल्या वाळवामध्ये त्यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन झालं. मात्र या भूमिपूजनाला हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. जयंत पाटील यांचा काहीही संबंध नसतांना त्यांच्या हस्ते भूमिजूजन झाल्याचा राग हुतात्मा गटामध्ये होता.
हेही वाचाः नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवले. नेमक्या यावेळी आमदार जयंत पाटील यांनी आंदोलकांकडे बघून एक स्मितहास्य केलं. त्यामुळे उपस्थित कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात झाली. आंदोलकांकडे बघून पाटलांनी स्मितहास्य केल्याची सांगली आणि परिसरात एकच चर्चा सुरु झाली आहे. 'टीव्ही९ मराठी'ने याबाबचे वृत्त दिले आहे.
दरम्यान, आक्रमक झालेले आंदोलक पोलिसांना आवरत नव्हते. पोलिसांना मोठ्या कष्टाने वाद टाळला. यावेळी राष्ट्रवादी आणि हुतात्मा गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. कार्यक्रमानंतर जयंत पाटलांना सुरक्षेसह बाहेर काढण्यात आलं.