Satish Kaushik Death : दुबईच्या पार्टीत आला होता दाऊदचा मुलगा; कौशिक मृत्यू प्रकरणाचं कनेक्शन काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik

Satish Kaushik Death : दुबईच्या पार्टीत आला होता दाऊदचा मुलगा; कौशिक मृत्यू प्रकरणाचं कनेक्शन काय?

नवी दिल्लीः सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतिश कौशिक यांच्या मृत्यूला अजून एक आठवडाही झाला नाही. त्यांचा मित्र विकास मालूकडे संशयाची सुई आली आहे. जेव्हा सतिश कौशिक यांची प्रकृती बिघडली तेव्हा ते कुबेर ग्रुपचे मालक विकास मालूच्या घरी होते. आता विकास मालूच्या दुसऱ्या पत्नीने एक नवीन मुद्दा उपस्थित केला आहे.

तक्रारीमध्ये सान्वी मालूने दावा केला की, २३ ऑगस्ट २०२२ रोजी तिचा पती विकास मालू याने दुबईमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अभिनेते सतिश कौशिक उपस्थित होते. या पार्टीत दाऊद इब्राहीमचा मुलगा हजर असल्याचं विकास मालूने आपल्याला सांगितल्याचा दावा पत्नीने केला आहे.

हेही वाचाः नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

या पार्टीच्या अगोदरच सतिश कौशिक विकास मालूच्या घरी गेले होते आणि त्यांच्यात १५ कोटींवरुन वाद झाला होता. सान्वी मालूच्या दाव्याने या प्रकरणाकडे वेगळ्या एँगलने बघितलं जात आहे.

मी सतिश यांच्या मृत्यूसंदर्भात तक्रार दिली असून ते एका पार्टीसाठी माझ्या पतीच्या फार्म हाऊसवर आले होते. तेथेच त्यांची प्रकृती बिघडली होती. शिवाय फार्महाऊसवर काही विघातक औषधं सापडले आहेत, असं विकास मालूची पत्नी सान्वीने म्हटलं आहे.

सान्वीने दावा केल्यानुसार दुबईच्या पार्टीत दाऊदचा मुलगा सहभागी झाला असेल तर त्याचा या प्रकरणाशी संबंध काय? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. 'आज तक'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

कोण आहे विकास मालू?

विकास मालू हा सतिश कौशिक यांचा जवळचा मित्र होता. तो दिल्ली येथील व्यापारी आहे आणि कुबेर ग्रुपचा संचालक आहे. विकासवर आरोप करणारी सान्वी मालू ही त्याची दुसरी पत्नी आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी विकास मालूच्या पत्नीने केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे. दक्षिण पश्चिम जिल्ह्याच्या निरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे, महिलेला तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी पोलिस बोलवणार आहेत.