
शिवसेनेच्या निष्ठावंत नेत्याची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले...
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं आहे.
या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आयोगाच्या निर्णयानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे.
एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या कट्टर समर्थक मानले जाणारे मात्र आता शिंदे गटात असलेले माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
अर्जून खोतकर आज माध्यमांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले की,'काल जो धनुष्यबाण आणि पक्षाचा निर्णय झाला, तो लाखो करोडो शिवसैनिकांच्या मनातील निर्णय झाला.
शिवसेना ज्यांच्या दावणीला यांनी बांधली होती ते दोरखंड एकनाथ शिंदे यांनी तोडले आहेत' तर संजय राऊतांवर बोलताना म्हणाले की, राऊत काय बोलतात हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्या आरोपांकडे आम्ही दुर्लक्ष करतो अशी टीका अर्जुन खोतकर यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली आहे.