esakal | शिवसेनेचे 'अर्जुनअस्त्र' म्यान; सत्तार राजीनाम्यावर ठाम
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar, Arjun Khotkar

अब्दुल सत्तार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. मात्र, याला पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

शिवसेनेचे 'अर्जुनअस्त्र' म्यान; सत्तार राजीनाम्यावर ठाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना त्यांच्याकडे पाठविण्यात आले होते. पण, सत्तार हे राजीनाम्यावर ठाम असल्याने खोतकरांची शिष्टाई अपयशी ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी राज्यमंत्री आहे, त्यामुळे किमान माझ्या मतदारसंघातील निर्णय मला घेऊ द्या; जिल्हा परिषदेच्या सदस्यांची भूमिका काय आहे, हे मला समजून घेऊ द्या. प्रत्येक वेळी आम्ही शिवसेनेचे जुने नेते आहोत म्हणून स्वतः निर्णय घेत असेल तर मी कशाला पक्षात राहू असे सांगत अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का समजला जात आहे. 

उद्धव ठाकरेंना पहिला धक्का; अब्दुल सत्तार यांनी दिला राजीनामा

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेमध्ये खळबळ उडाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शुक्रवारी विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांना भाजपच्या सर्व सदस्यांचे पाठबळ मिळाले. सोबतच काँग्रेसमधून फुटलेले अब्दुल सत्तार समर्थकही देवयानी डोणगावकर यांच्या बाजूने मतदान केले. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती, अशी चर्चा सुरू झाली. या घडामोडींसह कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिली. त्यांची मनधरणी करण्यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट घेतली. पण, ती अपयशी ठरली. 

अब्दुल सत्तार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. मात्र, याला पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री झाल्यावर नाराज होते. किमान कॅबिनेट मंत्री पदाची सत्तारांना अपेक्षा होती. त्यापाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हे त्यांच्या मर्जीचा अध्यक्षपद बसवावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी काही जुमानले नाही. त्यामुळे आपले उपद्रव मूल्य दाखवण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी नवी खेळी करून दाखवली असल्याची चर्चा सुरू आहे.