
शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, खोतकरांकडून ठोस प्रतिक्रिया मिळू न शकल्याने याबद्दल खोतकरांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच, दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं खोतकर यांनी म्हटलं होते. असा खुलासाही राऊतांनी केला. (Arjun Khotkar Sanjay raut Raosaheb Danve Maharashtra Politics)
"जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच "दोन दिवसांपूर्वीच माझं अर्जुन खोतकर यांच्याशी बोलणं झालं. यावेळी त्यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले होते. दानवेंबाबत त्यांनी आणखी काही शब्द वापरले होते. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत. तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे" असं संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकरांशी जवळपास दीड तास दिल्लीत चर्चा केली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात एकमेकांचे विरोधक असलेले दोन नेत्यांमधील वैर संपले का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान काल खोतकरांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण मी अजून शिवसनेतच असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांच्या मालमत्तेवर काही दिवसांपूर्वी ईडीची धाड पडली होती त्यामुळे ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दानवे खोतकर भेटीत नेमकं काय घडलं?
काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान दानवेंनी आज मला चहापाण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो पण आमच्या भेटीचा कोणीही गैरअर्थ घेऊ नये. मी दिल्लीत का आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, माणसांच्या काही अडचणी असतात, कौटुंबिक असो किंवा कोणतीही असो. तोच ताण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. नाही त्या गोष्टीमध्ये माणसांना अडचणी निर्माण केल्या जातात. माणूस अडचणीत असलं तर तो सेफ व्हायचा प्रयत्न करत असतो." असं मत अर्जुन खोतकरांनी दिल्लीत व्यक्त केलं
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.