अर्जुन खोतकरांच्या जावयावर मोठी कारवाई; क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Khotkar

अर्जुन खोतकरांच्या जावयावर मोठी कारवाई; क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा

शिंदे गटातील महत्त्वाचे नेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रिप्टोकरंसीमध्ये 500 कोटींचा घोटाळा प्रकरणी खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (arjun khotkar son in law and team india under 19 former captain vijay zol Case file against )

टीम इंडियाचा अंडर 19चा माजी कर्णधार विजय झोलवर गुन्हा दाखल झालाय. विजय झोल हा खोतकर यांचा जावई आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nagpur MLC : 'आमचा हिरमोड नक्कीच झाला...'गंगाधर नाकाडे उद्धव ठाकरेंवर नाराज?

घनसावंगी तालुक्यातील किरण खरात हे क्रिप्टो करंसीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. यामुळे खोतकर यांचे जावई अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी विजय झोल यांच्यावर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत आरोप?

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली, ज्यात या क्रिप्टो करन्सीचा मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरून क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केलाय.

हेही वाचा: Maharashtra Politics : राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण वाढले; ठाकरे गटाला भलताच संशय

पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटर विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह 15 जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर किरण खरात यांनी 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांच्याकडून करण्यात आला आहे.