
Maharashtra Politics : राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण वाढले; ठाकरे गटाला भलताच संशय
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांच्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे अघोरी विषयांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच जादुटोणा, लिंबू मिरची, टाचण्या, काळ्या बाहुल्या, रेडा बळी ही महाराष्ट्राची ओळख असता कामा नये अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नागपुरातील रेशीमबागेत गेले तेव्हाही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली होती.
जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळय़ा बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. मागे एकदा मुख्यमंत्री महोदय हे नागपुरातील रेशीम बागेतील संघ मुख्यालयात गेले. त्यावेळी लोकांनी त्यांची गंमत केली. ‘‘सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. मुख्यमंत्री येऊन गेलेत. संघ मुख्यालयातील कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू वगैरे पडले आहेत का तपासा!’’ असा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे खरा. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे असा सल्ला सामानातून एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....
विरोधकांच्या जीवितांच्या रक्षणासाठी निदान फडणवीसांनी पांडूरायालाला साकडे घालवं, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरूद्ध नेहमी लढा दिला, अंधश्रद्धेविरूद्द कायदे केले पण मिंदे सरकार आल्यापासून अंधश्रद्धांना उभारी मिळतेय.
मिंधे सरकार आल्यापासून अनेकांचे अपघात सुरु आहेत, त्यात विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाले, ते त्या काळात भाजप विरोधात बोलत होते. मिंदे सरकार येण्याआधीपासून त्यांचे अघोरी प्रकार सुरू होते. वर्षावरील अखेरच्या काळात उद्धव ठाकरेंना भयंकर आजारास समोरे जावे लागले.
हेही वाचा: G20 Pune : 'जे चुकीचं आहे ते चुकीचं'; राष्ट्रवादी G20 च्या प्रतिनिधींसमोर भाजपचा करणार पर्दाफाश
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून या राजकीय नेत्यांचे अपघात आणि जादूटोणा यावर भाष्य केलं आहे. शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही. काल पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. उपस्थितांच्या लक्षात हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले.
हेही वाचा: Kasba Election : 'कसबा झालाय भकास...', पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून पुण्यात पोस्टरबाजी
त्याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नागपूर अधिवेशनाच्या वेळी अपघातात जखमी झाले व त्यांचा उजवा खांदा निखळल्याने ते आजही सक्रिय नाहीत. विरोधकांचा बुलंद आवाज धनंजय मुंडे यांना त्यांच्याच बीड जिल्हय़ात मोठा अपघात झाला. त्यांची कार चक्काचूर झाली. मुंडे थोडक्यात बचावले, पण त्यांच्या छातीच्या बरगडय़ा तुटल्याने ते इस्पितळात खाटेला खिळून आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांनाही नाहक तुरुंगात जावे लागले ते याच राजकीय जादूटोण्यामुळे. विनायक मेटे यांनाही अपघाती मरण आले.