

Army Day Special: The Marathi Warrior Who Paralysed Pakistan's Supply Line
Sakal
केडगाव : १९७१ च्या भारत पाक युद्धात भारतावर हल्ला करण्यासाठी दारूगोळा, हत्याराने भरलेली रेल्वे गाडी लाहोरकडे जाणार होती. युद्ध चालू असताना पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन ही मालगाडी मध्येच अडविण्याची जबाबदारी एका उमद्या मराठी सैन्य अधिका-यावर सोपविण्यात आली. या अधिका-याने जीवाची बाजी लावत मोहिम फत्ते केली. रेल्वेचा अपघात घडविण्यात आला. पाकिस्तानी लष्करात हाहाकार माजला. रसद थांबली. अन् युद्धही थांबले.