‘त्या’ गोळ्या अजून ग्रामीण भागात पोहोचल्याच नाहीत...

homeopathy
homeopathy

जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यावर उपाययोजना करुनही दिवसेदिंवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यावर मात करण्यासाठी अनेक औषधांचा वापर केला जात आहे. परंतु यावर अद्यापही ठोस औषध निघालेले नाही. मात्र, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० व आयुर्वेदिक औषध उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामविकास विभाग हे औषध देण्यासाठी पुढे सरसावला आहे. राज्यातील पाच कोटी नागरिकांना हे औषध मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मात्र, अद्यापही काही गावांमध्ये या गोळ्या पोहचल्याच नसल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आले आहे. काही ठिकाणी या औषधाचे वाटप सुरु झाले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्यात व देशात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीचे औषध चर्चेत आले. भारत सरकारचे आयुष मंत्रालय हे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे. आणि या उपचार पध्दती रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्याचा विकास व्हावा, या तत्त्वावर आधारित आहेत. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी जे शक्य होईल ते करायला हवे. आयुर्वेदिक औषध रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती क्षमता वाढवण्यास मदत करतं. अर्सेनिक अल्बम ३० या औषधावर संशोधन झालं असून ते रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं, असं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आयुर्वेदीक औषध उत्तम कामगिरी करत आहे. म्हणून या औषधांचा वापर वाढला आहे. 

लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कोरोना व्हायरसची लागण होत आहे. अशावेळी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जो तो प्रयत्न करत आहे. त्यात कोरोनामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चर्चेत असलेले अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषधांचा वापर केला पाहिजे, असे सर्वत्र सांगितले जात आहे. जेणेकरुन लोकांना कोरोना व्हायरसपासून लढण्यासाठी तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शक्ती येईल.

१ जुलैला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ट्विटमध्ये सांगितले होते की, ग्रामीण भागातील पाच कोटी नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० व आयुर्वेदिक औषध मोफत देण्यात येणार आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या समितींना देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तत्काळ जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला आवश्यक त्याप्रमाणे कमीतकमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी. खरेदी खर्चाची रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येणार आहे, ही प्रक्रिया व वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे. यावेळी विचारपूस केली असता  सांगोला, महूद, वैराग या भागात अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले आहे तर करमाळा आणि पंढरपूर मधील काही गावात अद्यापही या औषधांचा लाभ मिळालेला नाही.

अहमदनगर ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल म्हणाले, ग्रामविकास खात्याकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील कुटुंबाची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात साडेसात लाख कुटुंब असून त्यांना अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या वाटप करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गोळ्या वाटपाची प्रक्रिया जिल्ह्यात लवकरच वाटप केली जाणार आहे.

विक्रम मोरे म्हणाले, आमच्या गावात कोरोनापासून बचाव करण्यासाठी ग्रामपंचायतकडून अर्सेनिक अल्बम ३० व आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले आहेत. प्रत्येकांच्या घरोघरी येऊन औषध दिले आहेत. 

गणेश गायकवाड म्हणाले की, कोरोना सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत आमच्या गावात कसल्याही प्रकारचे अर्सेनिक अल्बम ३० व आयुर्वेदिक औषधांचे वाटप केले गेलेलं नाही. काही दिवस वाट पाहुयात पुढे जाऊन औषधांचे वाटप करतील. 

अमोल महारनवर म्हणाले, महिन्यात ग्रामपंचायतमार्फत अर्सेनिक अल्बम ३० व आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले आहेत. गावात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी गावकरी काळजी घेत आहेत. 

यावेळी रोहित हेगडे म्हणाले कि, आमच्या गावात गेल्या महिन्यात अर्सेनिक अल्बम ३० व आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी गावकरी पुरेपूर काळजी घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com