
नागपूरः कुख्यात डॉन अरूण गवळी ऊर्फ ‘डॅडी’ याला सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिल्यावर बुधवारी (ता.३) साडेबारा वाजताच्या सुमारास त्याची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी बाहेर धंतोली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांकडून बंदोबस्तातच त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत आणले.