'हा 1962 चा काळ नाही, तर 2022 मधील PM मोदींचं युग आहे'; भारत-चीन तणावावर मुख्यमंत्र्यांचं परखड मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arunachal Pradesh CM Pema Khandu

मुख्यमंत्र्यांनी भारत-तिबेट सीमेवरील तणावाला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरलंय.

'हा 1962 चा काळ नाही, तर 2022 मधील PM मोदींचं युग आहे'; भारत-चीन तणावावर मुख्यमंत्र्यांचं परखड मत

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (Arunachal Pradesh CM Pema Khandu) यांनी भारत-तिबेट सीमेवरील (India-Tibet Border) तणावाला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांना जबाबदार धरलंय.

मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात मुख्यमंत्री खांडू म्हणाले, 'शिमला करारानंतर तवांगसह संपूर्ण अरुणाचल प्रदेश भारताचा प्रदेश बनला. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची निर्णायक भूमिका होती. माजी पंतप्रधानांनी (जवाहरलाल नेहरू) वेळीच निर्णय न घेतल्यामुळं परिस्थिती सतत खराब होत गेली.'

हेही वाचा: Jawaharlal Nehru : जवाहरलाल नेहरूंना 'हे' व्यसन होतं; केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त विधान, महात्मा गांधींवरही निशाणा

तवांगचा भारतात समावेश करण्याची कल्पना सरदार पटेल यांची होती आणि राज्यपाल दौलतराम यांनाही तवांगमध्ये तिरंगा फडकवण्यास सांगितलं होतं. राज्यपालांनी मेजर बॉब खाथिंग यांना तिरंगा फडकवण्यास सांगितलं. तवांगला पोहोचून त्यांनी केंद्राकडं परवानगी मागितली. परंतु, कोणताही आदेश नसल्यामुळं खाथिंग यांनी स्वतः तिथं ध्वज फडकवला, असं खांडू यांनी सांगितलं.

हेही वाचा: प्रेमाच्या जाळ्यात 9 जणांना अडकवलं, नंतर ठेवले शरीरसंबंध; महिलेचा प्रताप पाहून न्यायालयही चक्रावलं!

'हे 2022 पीएम मोदींचं युग आहे'

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री खांडू पुढं म्हणाले, तवांगमध्ये 9 डिसेंबरला एक दुर्दैवी घटना घडली. चिनी सैन्यानं भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात काही जवान जखमी झाले. परंतु, हा 1962 चा काळ नाही तर 2022 मधील पीएम मोदींचा (PM Modi) काळ आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.