Arvind Kejriwal: 'मोरबी' पूल बनवणाऱ्या कंपनीकडून भाजपला फंडिंग?; केजरीवाल यांचे गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal: 'मोरबी' पूल बनवणाऱ्या कंपनीकडून भाजपला फंडिंग?; केजरीवाल यांचे गंभीर आरोप

Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील माचू नदीवरील झुलता पूल रविवारी (30ऑक्टोबर) कोसळला होता. या अपघातात आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलतांना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मोरबी पूल दुर्घटना हा एक भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. कुठलाही अनुभव नसतांना या कंपनीला विनाटेंडर मेंटेनन्सचा ठेका दिलाच कसा? असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला.

''एक घडी बनवणाऱ्या कंपनीला पूल बनवण्याचा ठेका का दिला? कुठलाही अनुभव नसतांना देखभालीचं काम देण्यात आलं. हा पूल बांधण्यासाठी वर्षभराचा कालावधी आवश्यक असतांना केवळ पाच महिन्यांमध्ये पूल का बांधला? पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कंपनीचं आणि मालकाचं नाव का नाही?'' असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत. पूल बनवणाऱ्या कंपनीकडून भाजपला फंडिंग होत होतं, हे खरं आहे का? असं केजरीवाल म्हणाले. राज्यात एवढी गंभीर दुर्घटना घडलेली असतांना मुख्यमंत्र्यांनी पदावर राहू नये, सरकारने पायउतार व्हावं, असंही आवाहन त्यांनी केलं.

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यासाठी तातडीनं निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीय. आता सुप्रीम कोर्टानं 14 नोव्हेंबरला सुनावणी घेण्याचं मान्य केलंय.

टॅग्स :Arvind Kejriwalaap