
सत्तासंघर्षानंतर शिंदे- शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते शिंदे गटाला लक्ष्य करत आहेत. तर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं जातंय. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.(Arvind Sawant attacks Narendra Modi Balasaheb Thackeray )
अकोला येथे शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी थेट मोदींना लक्ष्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांची आडवाणींसोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली हे सांगितलं आहे.
सावंत म्हणाले, मुंबईच्या महापौर बंगल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आडवाणीजींसोबत बैठक बोलावली. त्या बैठकीत साहेब बसले आणि आडवाणी साहेब बसले. त्यांनी सांगितलं की, बाळासाहेबजी, एक गंभीर समस्या आहे. आम्ही ठरवलं आहे की, मोदींना हटवायचं आहे. आठवतं का? अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, राजधर्माचं पालन. त्या पार्श्वभूमीवर मोदींना हटवायचं आहे.
त्यावर बाळासाहेब म्हणाले होते की, काय म्हणता? मोदींना हटवणार? मोदी गेले, तर गुजरात गेला, असं शिवसेनाप्रमुखांचं वाक्य आहे. त्या विधानानंतर आडवाणींनी वाजपेयींना फोन करून सांगितलं की, मोदींना हटवू नका', असा किस्सा सावतं यांनी यावेळी शेअर केला.
दरम्यान, आज मोदी देशाचे पंतप्रधान दिसताहेत ना. बाळासाहेबांनी वाचवलं नसतं ना, तर मोदी आज कुठल्या गल्लीत पडलेत, हे कळलं नसतं कुणाला. त्या उपकाराची फेड तुम्ही अशी करता आहात?', असं विधान अरविंद सावंत यांनी केलं. त्यांचे हे विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.