Aryan Khan Case - नवाब मलिकांनी सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

Aryan Khan Case - नवाब मलिकांनी सांगितलं सॅम डिसूझाचं  खरं नाव
Summary

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंग आणि सॅम डिसूझा यांच्यात फोनवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिपसुद्धा शेअर केली आहे.

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यानंतर या प्रकरणात साईल प्रभाकर यांनी सॅम डिसूझावर पैशांचे डील केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, या प्रकरणात आपण फक्त मध्यस्थाचं काम केलं, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं सॅमने म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सॅम डिसूझावर ड्रग्ज प्रकरणी काही आरोप केले होते. आता सॅम डिसूझाचे खरे नावही नवाब मलिक यांनी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी एनसीबीने सॅम डिसूझाला त्याच्या खऱ्या नावाने पाठवलेल्या नोटीसीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटरवर सॅम डिसूझाचा फोटो शेअर करताना म्हटलं की, ही व्यक्ती सॅम डिसूझा नाही. त्याचं खरं नाव सॅनविले स्टेनली डिसूझा असं आहे. त्याच्या खऱ्या नावाने एनसीबीने ड्रग्ज केस प्रकरणी नोटीस पाठवली आहे. तसंच नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंग आणि सॅम डिसूझा यांच्यात फोनवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिपसुद्धा शेअर केली आहे.

एनसीबीने सॅम डिसूझाला पाठवलेल्या त्याचा पत्तासुद्धा आहे. पेरी रोड, बांद्रा पश्चिम, लायन्स क्लब, मुंबई ४०००५० असा पत्ता त्यावर आहे. जून महिन्यात ही नोटीस पाठवण्यात आली होती. अद्याप त्यावर कारवाई झाली की नाही याची कोणतीच माहिती नाही.

दरम्यान, नवाब मलिक रविवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी या पत्रकार परिषदेबाबत त्यांनी माहिती दिली होती. विमानतळाजवळ असलेल्या ललित हॉटेलबाबत गुपितं उघड करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सॅम डिसूझा, मनिष भानुषाली आणि प्रभाकर साईल यांच्याबाबत आणखी काही बोलणार का याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com