आर्यन खानने लावली NCB कार्यालयात हजेरी; 4 मिनिटांत पडला बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

आर्यन खानने लावली NCB कार्यालयात हजेरी; 4 मिनिटांत पडला बाहेर

मुंबई: क्रुझ ड्रग प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यंना जामिन देताना कोर्टानं दर आठवड्याल एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. त्यानुसार आज आर्यन खान एनसीबी कार्यालयात आला होता. 4 मिनीटांत तो एनसीबी कार्यालयातून बाहेर पडला. हजेरी लावताना प्रत्येक वेळी जामिनाचे कागदपत्र सादर करुन एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.

हेही वाचा: एसटी संपाचे स्टेटस ठेवले, ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

आर्यन 4 मिनीटांत पडला बाहेर

आर्यन खान 4 मिनीटांत एनसीबी कार्यालयातून बाहेर पडला. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्यांना जामिनाचे कागदपत्र सादर करुन एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावल्यानंतर शनिवारी आर्यनला एनसीबीच्या एसआयटीनं समन्स बजावलं होतं, पण तब्येत बरी नसल्याचं कारण सांगुन आर्यननं यायचं टाळलं होतं.

loading image
go to top